Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे

📙📗शालेय अभिलेखे📗📙
शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –
१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
↔↔↔↔↔↔↔↔
*दाखल खारीज रजिस्टर,
 *जन्म प्रमान                    
*शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
*विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
*टी.सी. फाईल,
*टी.सी. जावक रजिस्टर,
*निकाल रजिस्टर,
*बढती रजिस्टर,
*गळती रजिस्टर,
*मूल्यमापन नोंदवही,
*बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
*अपंग विद्यार्थी रजिस्टर NB
 ↔↔↔↔↔↔↔↔
२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
*शिक्षक हजेरी रजिस्टर,
*पगारपेड रजिस्टर,
*शिक्षक सुचना रजिस्टर,
*शिक्षक हलचल रजिस्टर,
*शिक्षक रजेचे रजिस्टर,
*शिक्षक रजा अर्ज फाईल,
*वार्षिक व मासिक नियोजन
      रजिस्टर,
*मासिक अभ्यासक्रम
*प्रगतिपत्रक रजि.,
*पाठ टाचण वही,
*पगारपत्रक फाईल,
*मुख्याध्यापकांचे लॉगबुक
 ↔↔↔↔↔↔↔↔
३) आर्थिक अभिलेखे
*स.शि.अ. रोकड रजिस्टर,
*स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
*स.शि.अ. लेजर रजिस्टर,
*सादील रोकड रजिस्टर,
*सादील खर्चाची पावती फाईल,
*सादील लेजर रजिस्टर,
*बांधकाम खर्चाची पावती फाईल,
*बांधकाम रोकड रजिस्टर,
*बांधकाम लेजर रजिस्टर
*शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
*शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
*धनादेश नोंद रजिस्टर
↔↔↔↔↔↔↔↔
४) शासकीय योजना अभिलेखे
*मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
*मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
*शालेय पोषण आहार रजिस्टर,
*उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
*उपस्थिती भत्ता देयके फाईल
*अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
*आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
*दत्तक पालक योजना रजिस्टर
 ↔↔↔↔↔↔↔↔
५) जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)
*जंगम मालपुस्तिका,
*सामान्य मालपुस्तिका
      रजिस्टर
 ↔↔↔↔↔↔↔↔
६) कार्यालयीन इतर अभिलेखे
*पालक संपर्क रजिस्टर,
*आरोग्य तपासणी रजिस्टर,
*आरोग्य तपासणी कार्ड
      फाईल
*परीक्षा पेपर फाईल

अभिलेख जतन कालावधी
अ.क्र.  अभिलेख श्रेणी  अभिलेखाचे नाव  जतन करावयाचा कालावधी
(01)  अ  सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर 
- कायम
02)  अ  फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही  - कायम
(03)  अ  परिपत्रके, आदेश फाईल  - कायम
(04)  अ  भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही - कायम
(05)  अ  मुख्याध्यापकाचे लॉगबुक  - कायम
(06)  ब  रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान)  -30 वर्षे
(07)  ब  कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती - 30 वर्षे
(08)  ब  विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल  -30 वर्षे
(09)  ब  नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र  -30 वर्षे
(10)  ब  रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)  -30 वर्षे
(11)  ब  विद्यार्थी संचयी नोंदपत्रक  -30 वर्षे
(12)  ब  सेवा पुस्तिका  कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर -2 वर्षे
(13)  क-1  इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे  -10 वर्षे
(14)  क-1  शाळा सोडल्याचे दाखले - 10 वर्षे
(15)  क-1  फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही - 10 वर्षे
(16)  क-1  आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके  -10 वर्षे
(17)  क-1  विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके  -10 वर्षे
(18)  क-1  वसतिगृह खोलीभाडे नोंदवही  -10 वर्षे
(19)  क-1  महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार - 10 वर्षे
(20)  क-1  फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती  -10 वर्षे
(21)  क-1  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत)  -10 वर्षे
(22)  क-2  जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही  -5 वर्षे
(23)  क-2  आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब  -5 वर्षे
(24)  क-2  रोकडवही (शा. पो. आ.)  -5 वर्षे
(25)  क-2  शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही - 5 वर्षे
(26)  ड  सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)  -18 महिने
(27)  ड  शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज - 18 महिने