Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

अॉनलाईन अभ्यास

आपले मूल अभ्यासात त्याच्या वर्गात सरस असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. विषयाचे आकलन होणे, विषय समजावून घेणे आणि परिक्षेत आत्मविश्वासाने सादर करणे ह्या प्रक्रीयेतून प्रत्येक विद्यार्थी जात असतो. बरेचदा विषयाचे नीट आकलन न झाल्यामुळे पाठांतरावर भर दिला जातो त्यामुळे अपयशाची शक्यता वाढते. अभ्यासाचे तंत्र शिकून घेतल्यास ही अडचण येत नाही. नेटवर अगदी वर्गानुसार नसला तरी आपल्याला विषय आणि उपविषय समजून घेता येतात.
भाषा विकासाचा विचार करायचा झाल्यास तो अगदी जन्मापासून सुरु होतो. सर्वसाधारण समज आहे की बाळाचे भाषिक ज्ञान शाळेत गेल्यावर सुरु होते परंतु हे खरे नाही. जन्मापासून त्याचे पालक आणि नातेवाईक जेव्हा बाळाशी बोलतात, संवाद साधतात, खेळतात, चित्र काढायला शिकवतात, तेव्हापासूनच 'ब्रेन स्टीम्यूलेशन' चालू होते. आपली मातृभाषा किंवा व्यवहारीक भाषा (इंग्रजी) मुलांना शिकवायची असल्यास मुलांनी ती जास्तीजास्त भाषा ऐकणे, संवाद साधणे, भाषा बोलतांना येणा-या अडचणी समजावून घेणे, शब्दखेळ, वाचन, कथाकथन, नाटकं, कविता, त्या भाषेच्या सवंगडयांबरोबर जास्त वेळ घालवणे इत्यादी उपक्रम राबवण्यास पालकांनी जास्तीजास्त सहभागी व्हावे. त्या विषयी आपल्याला http://www.hellofriend.org/parents/language.html,http://www.sil.org/lglearning/developing.htm ह्या लिंकवर कुठलीही भाषा शिकण्याच्या खालिल पाय-या दिल्या आहेत - भाषेतल्या शब्दांचा उच्चार योगरित्या करा, शुध्द व्याकरण वापरा, शब्दसंपदा वाढवा, मोठया वाक्यांची रचना करायला शिका, तुम्हाला काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न करा, वेगवेगळ्या प्रसंगी योग्य शब्द आणि वाक्यांचा वापर करायला शिका, इतर लोकांबरोबर त्याच भाषेत संवाद साधा... अश्या अनेक टिप्सचे सखोलपणे लेख आपल्याला वाचायला मिळतात


अॉनलाईन अभ्यास        इथे क्लीक करा