Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

मुलांचे अॉनलाईन वाचन

मंगोलियात वीस मुलांचा वर्ग असतो. त्यात एकवीसावा मुलगा नवीन येतो, त्याला बसायला बाक नसतो म्हणून खाली चटईवर बसून गणित शिकतो. बाई विचारतात, "किती अधिक किती चार होतात ?" आदल्या दिवशीच शिकविल्यामुळे मुले एक सुरात उत्तर देतात "३+१". एकवीसावा मुलगा उत्तरतो,"२+२ चार होतात".
एकदा चित्रकला स्पर्धेत, वर्गातली वीसही मुलं पक्षांची, फुलांची, प्राण्यांची चित्र काढतात. एकवीसावा मुलगा मात्र त्याचे स्वत:चे चित्र 'मॉन्सटरशी' हात मिळवतांना काढतो. दोघांनी शस्त्र खाली टाकलेली असतात आणि खाली लिहीलेले असत 'युध्द वाईट असते'. प्रसंग महत्त्वाचे नाही तर महत्त्वाचे आहे एकवीसाव्या मुलाचे वेगळे विचार करणे, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिने बघणे. ही गोष्ट मंगोलियन भाषेत असून सुध्दा चित्रांच्या सहाय्याने मला सहज वाचता आली.
हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो. आज काळानुसार वाचनाची माध्यमेही बदललेली आहेत, अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील ऑनलाईन वाचनाला नव्या पीढीची सर्वाधिक पसंती आहे. ऑनलाईन वाचन म्हणजे नक्की काय? मुलांनी कुठे, कधी, किती वाचायचे ? इंटरनेटवर वयोगटानुसार बालवाडी (प्रिस्कूल), प्राथमिक गट (एलिमेंट्री), कुमारगट अश्या वर्गवारीनुसार तसेच विषयानुरुप साईटस आहेत. ऑनलाईन किंवा डिजीटल लायब्ररीही नेटवर खूप आहेत. तेथे पुस्तकांची व्यवस्थित सुची केलेली असते. अगदीच अडल्यास, सर्च करता येते.
लहान मुलांच्या साईट्स भरपूर आहेत परंतु बरेच वेळा नेटवरच्या वाचनाची तुलना पुस्तक वाचनाशी केली जाते. दोन्ही माध्यमे वेगळी आहेत आणि त्यातल्या वाचनाचा आनंदही वेगवेगळा आहे. नेटवरच्या वाचनाने आपल्या मुलांना एक व्यापक दृष्टी मिळेल ह्यात शंकाच नाही.



मुलांचे अॉनलाईन वाचन    इथे क्लीक करा