Pages


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दररोज उपडेट होणाऱ्या संकेतस्थळावर मी श्री तोगे जी . आर .आपले सु-स्वागत करतो .

दफ्तराचे ओझे- समस्या व उपाय

दफ्तराचे ओझे- समस्या व उपाय

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🔰महाराष्ट्र ॲडमीन पँनल
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰



⚠️मा.उच्च न्यायालयाने आजच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला फटकारले आहे.

⚠️चला आपण याविषयाची संपुर्ण माहिती घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करायचे हे पाहू.
👇👇👇👇👇👇👇

👉 मुलांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती.

👉 शिक्षण संचालक महावीर माने यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाला सादर करण्यात आला.

👉 त्यातील शिफारसी चांगल्या असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आणि यासंदर्भात काही सूचना केल्या. या अहवालाचा अर्जदारांनी अभ्यास करून आपले मत मांडावे, असेही न्यायालयाने सांगितले.

👉दप्तराचे ओझे किती असावे, याच्या मानकापेक्षा तिप्पट ओझे 12 वर्षांच्या मुलांच्या पाठीवर असते, असे निरीक्षण उच्चस्तरीय समितीने नोंदवले आहे.
याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

👉 सामान्यतः मुलांच्या वयाच्या 10 टक्के एवढेच दप्तराचे ओझे असावे, असे अपेक्षित आहे; मात्र 12 वर्षांच्या मुलांच्या दप्तराचे ओझे 30 टक्के, म्हणजे साडेतीन किलो असते, असेही समितीला आढळून आले आहे.

🔆 राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशी 🔆

👉 मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सत्रनिहाय कमी पानांची एकत्रित पुस्तके काढावीत.

👉 एका दिवशी केवळ दोन किंवा तीन विषयांच्या तासिका असाव्यात.

👉 शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (घर आणि शाळेसाठी) करावेत.

👉 संगणकाद्वारे अभ्यास करावा.

👉 क्रीडा साहित्य शाळेनेच द्यावे आणि फिल्टर केलेले स्वच्छ पाणी पुरवावे.

🔆अहवालातील निष्कर्ष🔆

👉 ग्रामीण भागात दप्तराचे वजन कमी, शहरांत जास्त

👉 सीबीएसई, आयसीएसई शाळांची दप्तरे जास्त जड

👉 मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे दुष्परिणाम

👉 10 वर्षांपेक्षा लहान 58 टक्के मुलांना त्रास

👉 12 वर्षांपेक्षा लहान 75 टक्के मुलांना त्रास

🔆 इतर शिफारसी 🔆

👉 दोन किंवा तीन महिन्यांच्या सत्रानुसार लहान पुस्तके छापावीत

👉 भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल अशा तीन पुस्तकांची एकत्रित बांधणी

👉 बालभारतीने पुस्तक छपाईसाठी वजनाला हलका कागद वापरावा.

👉 गृहपाठाच्या वह्या दोन-तीन विषयांसाठी एकत्रित कराव्यात

👉 200 ऐवजी 100पानी वा त्याहूनही कमी पानांच्या वह्या घ्याव्यात

👉 जाड कव्हरच्या वह्यांवर बंदी घालावी

👉 गृहपाठाचे विषयनिहाय साप्ताहिक वेळापत्रक करावे

👉 वह्यांऐवजी वर्कशीटचा वापर करून त्या वर्गातच जमा कराव्यात

👉 वेळापत्रकात दररोज केवळ तीन विषयांच्या तासिका असाव्यात

👉 कमी तासिकांमुळे वह्या व पुस्तके कमी लागतील

👉 स्वाध्याय, गाईड, मार्गदर्शक पुस्तके शाळेत आणू नयेत

👉 सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकच पुस्तक निवडावे

👉 संगणकाद्वारे ई-लर्निंगवर भर द्यावा

👉 पुस्तकांऐवजी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात अभ्यास व्हावा

👉 ई-लर्निंग, टॅब्लेट पीसी, प्रोजेक्‍टर अशी डिजिटल क्‍लासरूम व्यवस्था

👉 बालभारतीच्या संकेतस्थळावर पुस्तके उपलब्ध करून द्यावीत

👉 शैक्षणिक संकेतस्थळे आणि साहित्याचा उपयोग करावा

🔆शाळांसाठी सूचना🔆

👉 वह्या व पुस्तके शक्‍यतो शाळेतच ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच करून एक शाळेत व एक घरी ठेवावा

👉 वह्या, पुस्तके ठेवण्यासाठी शाळेत कपाटे, लॉकर ठेवावेत

👉 क्रीडा साहित्य, पिण्याचे फिल्टर्ड पाणी शाळेनेच पुरवावे.

🙏स्त्रोत -दै.सकाळ शनिवार
४ जुलै  २०१५🙏